Disha Shakti

राजकीय

निलेश लंके यांची उद्यापासून स्वाभिमान जनसंवाद यात्रा; मोहटादेवी गडावरून होणार सुरुवात

Spread the love

विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण  : नगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सोमवारपासून स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू करणार आहेत. पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते , खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेला सुरुवात होणार आहे.

नगर लोकसभा मतदारसंघासाठी पारनेर चे आमदार निलेश लंके यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. तसेच निलेश लंके यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. याआधी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये जनसंवाद यात्रा काढली होती. त्यानंतर आता निलेश लंके हे आज सोमवारपासून स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू करत आहेत. मोहटादेवी गडापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समन्वयक अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सचिव ऍड.प्रताप ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नगर लोकसभा मतदार संघातील तालुके आणि गावागावांत ही यात्रा जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून निलेश लंके जनतेशी संवाद साधणार आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!