विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : राम नवमी हिंदू धर्मातील महत्वाच्या सण आहे, ज्याला भारतात विशेषत: उत्तर भारतात साजरा केला जातो. हा त्या दिवशी हनुमान जन्माला पारितोषिकाने नामकरण केला जातो. राम नवमी हा श्रीरामाच्या जन्माच्या धार्मिक आणि सामाजिक महत्वाचा सण आहे, जो की चैत्र महिन्यातील नवमी दिवशी साजरा केला जातो. हा सण भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वपूर्ण आहे. या दिवशी, भक्तांनी रामचंद्राच्या मंदिरांत जाऊन आराधना केली जाते आणि पुस्तके, रामायण कथांची वाचन केली जाते.
रामनवमी चे औचित्य साधून टाकळी ढोकेश्वर गावात भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृती, लोकसभ्यता आणि विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारी ही अनोखी शोभायात्रा ठरली टाकळी ढोकेश्वर च्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी.
सकाळी ठीक ९ वाजता हनुमान मूर्ती अभिषेक करून शोभयात्रा सुरू झाली. महात्मा फुले चौक (वासुंदा चौक) – बाजार तळ – हनुमान मंदिर – या मार्गांवर शोभयात्रा काढली होती.शोभयात्रेचे विशेष आकर्षण म्हणून लेझीम पथक धुमाळ वस्ती व धर्मनाथ लेझीम पथक निवडुंगेवाडी यांचे आयोजन केले होते, तसेच सनई पथक, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती, त्यानंतर हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण व आरती करण्यात आली, रामरक्षा पुस्तकाचे वाटप करण्यात आले, प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा सर्व कार्यक्रम हिंदवी प्रतिष्ठान व सकल हिंदु समाज, टाकळी ढोकेश्वर यांनी आयोजित केला होता.
श्रीराम नवमीनिमित्त टाकळी ढोकेश्वरमध्ये मिरवणूक, हिंदवी प्रतिष्ठान व हिंदू समाज टाकळीढोकेश्वर यांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन

0Share
Leave a reply