Disha Shakti

राजकीय

भूमिपुत्र शेतकरी संघटना पाण्याच्या प्रश्नावर ठोस आश्वासन देणाऱ्याच्या पाठीमागे जाणार, बैठकीत संतोष वाडेकर यांची भूमिका स्पष्ट

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रखरपणे मांडणारी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी अहमदनगर येथे मंगळवारी दि. ३० एप्रिल रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा व पारनेर या भागातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

सध्याचे केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देत नाही. अशी भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये मांडली.
संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर म्हणाले सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत शेतकरी हितासाठी जे काम करतील आणि त्यासंदर्भात आपल्याला ठोस आश्वासन देतील अशा उमेदवारा सोबत आपण जाण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे अनेक दिवसांपासून या प्रश्नांवर निवडणुकांमध्ये राजकारण केले जाते. शेतकऱ्यांना नेहमीच कृषी प्रश्नांवर झुलवत ठेवले आहे त्यामुळे यापुढील काळात शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या लोकांसोबत संघटना असेल असे ते यावेळी म्हणाले तसेच वाडेकर पुढे बोलताना म्हणाले पाण्याचा प्रश्न हा नगर दक्षिणचा गंभीर आहे. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये आज पाणीच पाणी आहे. परंतु नगर दक्षिण मध्ये दुष्काळी परिस्थिती सध्या तीव्र आहे. पाण्याच्या प्रश्नावर जो उमेदवार ठोस निर्णय देईल आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करेल अशा उमेदवाराबरोबर आम्ही जाणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अहमदनगर येथे बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष अशिफ शेख, राज्य संपर्कप्रमुख अशोक आंधळे, जिल्हा संघटक संतोष वाबळे, पाथर्डी तालुकाध्यक्ष गणेश सुपेकर, शेवगाव तालुका समन्वयक संदीप राजळे, नेवासा तालुकाध्यक्ष महेश धाडगे, कर्जत जामखेड तालुका समन्वयक हनुमंत पावणे महाराज, राहुरी तालुकाध्यक्ष सागर भिंगारे, नगर शहर अध्यक्ष कर्डिले, पारनेर तालुका सचिव नंदू साळवे, प्रवीण खोडदे, सुभाष पाटील करंजुले, साईनाथ घोरपडे, संगमनेर तालुकाध्यक्ष संदीप शिंदे, तालुका संघटक सतीश तनपुरे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब वाळुंज, पारनेर तालुका कार्याध्यक्ष संजय भोर, नारायण रोकडे, अण्णा सोबले, संतोष गागरे, सतीश भनगडे, विश्वनाथ वाघ, मंजाबापू वाडेकर, नंदन भोर, तेजस भोर, दादू जांभुळकर, शिवाजी तांबे, शिवाजी चिकणे, चांद भाई शेख, ज्ञानेश्वर गायकवाड, रामभाऊ तुवर, रावसाहेब पवार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!