Disha Shakti

सामाजिक

शिवधर्म प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त केला राहुरी खुर्द येथील10 वी 12 वी च्या मुलींचा केला गुणगौरव

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : दि.३१/०५/२०२४ रोजी शिवधर्म प्रतिष्ठानच्यावतीने राहुरी खुर्द येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त राहुरी खुर्द येथील १० वी व १२ वी मध्ये उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या मुलींचा सत्कार शिवधर्म प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रतिक्षा सुनिल शेडगे यांनी १० वी, रेणुका अशोक शेटे व श्रेया सतिष पावटे यांनी १२ वी मध्ये उत्कृष्ट गुण संपादन करून परिवार व गावाचे नावलौकीक वाढवल्याबदल शिवधर्म प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपत्र व सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला व त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचाली करता त्यांना शिवधर्म प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच आहिल्याबाई होळकर यांची जंयती व दि. २७/०५/२०२४ रोजी झालेल्या रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवन कार्याची आवश्यक व महत्वपुर्ण माहिती कु. ज्ञानेश्वरी संजय नजन हिने तिच्या उत्कृष्ट भाषणातून दिली. तिने केलेल्या उत्कृष्ट भाषणाबदल तिचा शिवधर्म प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिवधर्म प्रतिष्ठानचे निखिल चौभारे, अमोल जाधव, हर्ष पालवे, ओंकार नजन, महेश घाडगे, गणेश भडांगे, सुशिल तोडमल, शंतनुराव घोरपडे, सिध्दार्थ डोळस,ओंकार पवार, विशाल शेटे, राम कदम, श्रीनाथ पावटे, वैभव दातिर, आकाश पेटारे, सौरभ पुधांर, शुभम मेहेत्रे, प्रीतम जाधव हे सदस्य व सत्कार करण्यात आलेल्या मुलींच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. उपस्थित परिवाराचे सदस्य, महिला वर्ग व गावातील नागरिकांच्या वतीने शिवधर्म प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मुलींच्या गौरव कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक करण्यात आले व प्रतिष्ठानच्या भविष्यातील पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे सुत्र संचालन हर्ष पालवे यांनी केले व कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व परिवारांचे, महिला वर्गाचे व सदस्याचे आभार शंतनुराव घोरपडे यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!