राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दि.८ऑक्टोंबर रोजी राहुरी नगर पाथर्डी विधानसभेचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ तमनर आखाडा येथील मंदिरात नारळ फोडून प्रचारास सुरवात केली.
तमनर आखाडा येथील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी गावात घरोघरी जाऊन तरुण, जेष्ठ व महिला भगिनींच्या भेटी घेऊन मतदारांना विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने तमनर आखाडा या गावातून लीड द्यायचा मानस ठेवून कार्यकर्ते जोरदार प्रचार करत असून जास्तीत जास्त मतदारांनी 20 नोव्हेंबर रोजी आपल्या मतदानाचा हक्क वाजवून तुतारी चिन्हांस मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून मतदारांना करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते.
तमनर आखाडा येथे राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभेचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ नारळ फोडून प्रचारस शुभारंभ

0Share
Leave a reply