Disha Shakti

राजकीय

श्रीरामपूरची काँग्रेस फुटली आहे – सत्यजित कदम राहुरी तालुक्यातील ३२ गावात आ. कानडे यांच्या प्रचार सभांना मोठा प्रतिसाद

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार :  श्रीरामपूरची खरी काँग्रेस आमदार लहू कानडे यांच्या कामामुळे जिवंत होती. आ. कानडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने श्रीरामपूरची काँग्रेस फुटली आहे. आता केवळ एका कुटुंबाला मानणारे ठराविक टोळके तेवढे काँग्रेस म्हणून शिल्लक असल्याची टीका देवळाली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केली.

विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ राहुरी तालुक्यातील ३२ गावातील तिळापुर, वांजुळपोई, कोपरे, शेणवडगाव, खुडसरगाव, पाथरे खुर्द, मांजरी येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते, यावेळी आ. कानडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, उद्योजक अंकुश कानडे, अमृत काका धुमाळ, वेणुनाथ कोतकर, अजित कदम, नानासाहेब रेवाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अँड संदीप चोरगे, दीपक पवार, यावेळी उपस्थित होते.

श्री. कदम म्हणाले, प्रामाणिकपणे भेदभाव न करता सर्वांची कामे करणारे आ. कानडे यांची उमेदवारी नाकारणारे काँग्रेस, आ. कानडे महायुतीच्या घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह सामील झाल्याने श्रीरामपूरची काँग्रेस फुटली आहे. खरी काँग्रेस आ. कानडे यांची कामामुळेच जिवंत होती. आता केवळ एका कुटुंबाला मानणारे ठराविक टोळके तेवढे काँग्रेस म्हणून शिल्लक आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून येणारच नाही, पण त्यांचेच ऐकून त्यांचाच असणारा एक माजी आमदार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश देऊनही बागी उमेदवार म्हणून रिंगणात आहे. महायुतीची मते खाणाऱ्यासाठी काँग्रेसवाल्यांनीच रचलेले हे षडयंत्र आहे. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे घोषित केलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादीचे आ. लहू कानडे यांनाच मतदान करावे, आपली मते वाया घालू नयेत, आमदार आपले प्रश्न सोडवण्यासाठी निवडून द्यायचा असतो, म्हणून ज्यांना हे प्रश्न समजतात, ज्याला शासन प्रशासनाचे ज्ञान आहे व ज्यांनी मागील पाच वर्षात उत्कृष्ट काम केलेले आहे, ते सर्व परिचित आ. कानडे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

आ. कानडे म्हणाले, मायबाप जनतेने विश्वास दाखवून पाच वर्षांपूर्वी आपल्याला संधी दिली. ती जबाबदारी समजून आपण प्रामाणिकपणे काम केले. मतदार संघात बाराशे कोटीहून अधिक रुपयांची विकास कामे केली. त्याचे फळ म्हणून ज्यांची दुकाने बंद झाली, अशांनी कट कारस्थान करून व वरिष्ठ नेत्यांचे कान भरून उमेदवारी कापली. परंतु मुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारविनिमय करून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली. मायबाप जनतेने आपल्याला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

अविनाश आदिक, दीपक पटारे यांनी आपल्या भाषणातून, आ. कानडे व पालकमंत्री विखे यांनी मतदार संघात केलेल्या विकास कामांची माहिती दिली. आ. कानडे निस्वार्थी व प्रामाणिक उमेदवार असल्याने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कोंडाजी विटनोर, अनिल बिडे, सरपंच सौ. आंबेडकर, आशिष बिडगर, पोपट भगत, रामदास भिसे, तुषार विटनोर, भाऊसाहेब थोरात, सोपान विटनोर, काशिनाथ विटनोर, दत्तू विटनोर, राजू बिडकर, अण्णासाहेब विटनोर, कारभारी विटनोर, खंडेराव जाधव, हभप परशुराम जाधव, नारायण टेकाळे, रंगनाथ काळे, शंकर जाधव, डॉ. बाळासाहेब जाधव, परसराम लोखंडे, अजित जाधव, दत्तात्रय जाधव, संजय पवार, दिलावर पठाण, अच्युत जाधव, आप्पासाहेब टेकाळे, अर्जुन पवार, नारायण रिंगे, रामभाऊ सोळुंके, गणेश थेवरकर, आबासाहेब पवार, शरद पवार, मधुकर काशिनाथ पवार, मधुकर यमाजी पवार, भाऊसाहेब गुरसळ, ज्ञानेश्वर निशाणे, आप्पासाहेब देठे, भाऊसाहेब देठे, रामकृष्ण जगताप, जगन्नाथ जगताप, ज्ञानेश्वर घोडके, भगीरथ क्षीरसागर, ऋषिकेश जगताप, भगीरथ जाधव, राजू शिंगाडे, भीमभाऊ दोडके, विशाल जाधव, दत्तात्रय जाधव, शांतीलाल शिंदे, सुरेश मोरे, सतीश जाधव, शांतीलाल वंजारे, दादासाहेब माळी, सुभाष शिंदे, गणेश जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!