तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी या दोघांच्या अटीतटीच्या शर्यतीत महाविकास आघाडी मित्र पक्षाचे तथा समाजवादी पक्षाचे सर्वसामान्यांचे आशेचा किरण म्हणून ओळखले जाणारे देवानंद भाऊ रोचकरी यांची सरशी अटळ असल्याची प्रतिक्रिया रोचकरी मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार शिवाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात देवानंद भाऊ यांना मोठा प्रतिसाद मिळत असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले देवानंद भाऊ हा सर्वसामान्यांचा आधार असल्याचे सांगून सर्व थरातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून निव्वळ आश्वासन न देता सर्वांच्या हाकेला धावून जाणारा तळागाळातील कार्यकर्त्यांचा असल्याचा पुर्नविचार करून गेली 25 वर्षे सतत जनतेच्या संपर्कात राहून अडचणी सोडवणारा तळागाळातील सर्व सामान्यांचा आधार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
राणा दादांचा जनतेशी कसलाही संपर्क नसून ठराविक लोकांचे आमदार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तालुक्यात सिंचनाचे काम झाल्याने माजी मंत्री चव्हाण यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासल्याचे सांगून तुळजापूर तालुक्यात दोन मोठे सहकारी साखर कारखाने तर चार प्रायव्हेट कारखाने चालतात याला सोडून तालुक्याच्या बाजूने गोकुळ सहकारी साखर कारखाना इंदिरा सहकारी साखर कारखाना लोकमंगल सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना अशा अनेक कारखाने हजारो टन ऊस पुरवला जातो याचे सर्व श्रेय माननीय मधुकरराव चव्हाण यांना जाते.
कुसळाचा तालूका आशी ओळख आसलेला तुळजापूर तालुका म्हणणाऱ्या या तालुक्यामध्ये आज सिंचनाचे क्षेत्र वाढविण्या पाठीमागे केवळ मधुकरराव चव्हाण आहेत आणि हे जनतेतून बोलले जात आहे या भागातून बाहेरील जवळपास सहा कारखान्यात ऊस पुरवठ्याचे काम शेतकरी करीत असल्याचे सांगितले.
या मतदारसंघात प्रत्यक्ष जनसंपर्क, सुसंवाद, मतदारांच्या अडचणी यावर चर्चा करून योग्य वेळी योग्य मार्ग काढण्याचा मानस असल्याचे सांगून देवानंद भाऊ यांच्या विजयासाठी रोच करी समर्थक कार्यकर्ते मोठ्या उमेदीने कामाला लागले असून यात अड. नागनाथ कानडे, लिंग या स्वामी, दिलीप लोमटे, भैरवनाथ माडजे, महावीर मुळे, हनुमंत जाधव, पांडुरंग बोंगरगे , पठाण, शिवानंद भुजबळ, लक्ष्मण पाटील, अण्णा गुंड असे असंख्य कार्यकर्त्यांनी देवानंद भाऊंना विजयासाठी प्रचंड आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. अखेरच्या अटीतटीच्या लढतीत भाऊंचा विजय निश्चित असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
Leave a reply