राहुरी प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी विद्यापीठ ते डिग्रस रात्री आठच्या सुमारास युवा नेते अक्षय कर्डिले यांनी आपल्या वडिलांसाठी म्हणजेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ विद्यापीठ पासून तर डिग्रस पर्यंत भव्य अशी मोटरसायकल रॅली काढून डिग्रस युवकांची मन जिंकली या रोड शो मध्ये डिग्रस गावातील असंख्य युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ही रॅली डिग्रस गावांमधून कोयबा माळापर्यंत काढण्यात आली होती. या रॅलीला पाहण्यासाठी असंख्य जनसमुदायाची गर्दी केली होती.
या रॅलीचे रूपांतर अखेर सभेमध्ये कोयबामाळ येथे झाले. या सभेचे अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ पटेकर यांनी स्वीकारून या सभेला सुरुवात केली. सुरुवातीला मान्यवरांचे भाषण झाल्यानंतर युवा नेते अक्षय कर्डिले यांचे भाषणाला सुरुवात झाली. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की राहुरी पाथर्डी नगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचार रॅलीत असंख्य तरुण व महिला भगिनी सहभागी झालेले दिसले व त्यांनी कार्यकर्त्यांची आभार मानले.
डिग्रस कोळबामाळ येथील काही महिलांनी युवा नेते अक्षय कर्डिले यांची भेट घेऊन आपापल्या समस्या मांडल्या अक्षय कर्डिले बोलताना म्हणाले की भाजप सरकारने यावर्षीची दिवाळी महिलांसाठी चांगल्या प्रकारे गोड केली लाडक्या बहिणीच्या महिलेच्या खात्यावर ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर प्रत्येक महिलेच्या खात्यावर पैसे जमा केल्याने यावर्षी दिवाळीला पैसे कोणाकडे उसने किंवा घरातील एखादा दागिना गहाण न ठेवता माता भगिनींनी हा दिवाळीचा सण चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला.
यावेळी त्यांनी विरोधकावर टीका करताना म्हटले की विद्यमान आमदारांनी डोळ्यावरचा मोठा भिंगाचा चष्मा काढून काय कामे केले ते दाखवावे. मामाच्या कृपेने झालेले आमदार ते जनतेचे काय काम करणार असा शब्दात विरोधकावर टीका करीत पुढे म्हणाले की मी ऐका फोनवर काम करितो मला दुसऱ्या फोनची गरज पडत नाही मला तुम्ही केव्हाही अर्ध्या रात्रीला फोन करा मी तुमच्या फोन अर्ध्या रात्रीत उचलील व तुमच्या समस्या सोडवीन माझे डिग्रस गावावर जास्त प्रेम असल्याने डिग्रज गावाच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम तुमच्या पाठीशी उभा राहील.
यावेळी या सभेसाठी संकेत जनसमुदाय उपस्थित होता. या सभेसाठी भाजप युवा कार्यकर्ते डिग्रस ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य अमोल बेलेकर व संदीप ओहोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सभेसाठी आर पी आय महिला जिल्हा उपाध्यक्ष सीमा बोर्डे, सरपंच कुंडलिक गावडे, सतीश बोरुडे, पप्पू मकासरे ज्ञानेश्वर भिंगारदे, रंभाजी गावडे हे भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
युवा नेते अक्षय कर्डिले यांची विद्यापीठ ते डिग्रस भव्य मोटर सायकल रॅली, रॅलीला युवकांचा मोठा प्रतिसाद

0Share
Leave a reply