राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी येथील जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे चेअरमन यांनी रासपच्या आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कार्यकर्ता सवांद मेळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून अखेर राष्ट्रावादी अजित पवार गटामध्ये खासदार सुनेत्रा पवार यांच्या उपस्थीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे.
यावेळी शरद सबाजी बाचकर, शशिकांत मतकर, सौ.अनिताताई बागुल, संजय वाघमोडे, नारायणराव रोडे, आनंद पाटील देवकाते हे प्रमुख नेत्यांसह मोरे, कपिल लाटे, नितीन शहाणे, अशोक बाचकर, दिपक बाचकर, उत्कर्ष बाचकर,भारत हापसे, आदेश मतकर व अलकाताई पवार व असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा .ना . श्री.अजित दादा पवार साहेब यांच्या विचारास प्रेरित होऊन मा खा. सुनेत्रा ताई पवार व मा श्री पार्थजी अजितदादा पवार साहेब. व राष्ट्रवादीचे प्रदेश युवक नेते मा श्री अक्षयजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
तसेच लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा घेऊन उर्वरित शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश केला जाणार असल्याचे शरद बाचकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर यांची रासपाला सोडचिट्टी ; कार्यकर्त्यांसह केला राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

0Share
Leave a reply