Disha Shakti

राजकीय

आमदार कांदे यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांच्या शेतात धरणाच्या पाण्याचा व शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

Spread the love

दिशाशक्ती नांदगाव / खंडू कोळेकर : नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे शिवारात ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न भेडसावत होता, शेती पिके होरपळत होती,जनावरांच्या चारा प्रश्न निर्माण झालेला होता. अशा परिस्थितीत पिंप्राळे येथील शेतकऱ्यांनी आमदार सुहास अण्णा कांदे व सहकाऱ्यांची भेट घेत आपले प्रश्न मांडले, आमदार साहेबांनी परिस्थितीची दखल घेत तात्काळ प्रकल्प प्रशासनाला सूचना करत सहकार्यांद्वारे शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावणे बाबत कळविले असता, प्रकल्प प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी दखल घेत दि.३ गुरुवार रोजी दुपारी चार वाजता नाक्या-साक्या धरणातील डावा कालवा पाटचारीद्वारे पिंप्राळे शिवारातील शेतकरी, प्रकल्प कर्मचारी, मनमाड बाजार समितीचे माजी सभापती अंकुश कातकडे यांच्या हस्ते गेट उघडत सर्वांचे उपस्थितीत पाटचारी द्वारे पाणी सोडले. याकामी युवा सेना अध्यक्ष सागरभाऊ हिरे यांचे विशेष प्रयत्न असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी काळू भाऊ शिंदे व सहकार्यांद्वारे उपस्थित मान्यवर प्रकल्प कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पिंप्राळे शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत होती, आता जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. असे शेतकरी बांधव यावेळी व्यक्त होत होते. यावेळी शेतकरी बांधवांच्या वतीने आमदार सुहास अण्णा कांदे यांचे विशेषआभार व्यक्त करण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!