राहुरी ता/अशोक मंडलिक : राहुरी, अकोले, श्रीगोंदा या तीन तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहमदनगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या पत्रात जिल्हाध्यक्ष पवार यांनी म्हंटले की, राहुरी, अकोले, श्रीगोंदा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची संघटना बांधणीसाठी व नवीन सक्रीय कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून काम करणे व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची बांधणी करण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनांवरुन आता कार्यरत असलेली तालुका अध्यक्षांसह कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.