दिशा शक्ती प्रतिनिधी / किरण थोरात : जागतिक कॅडेट व ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा तसेच आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील १९ खेळाडूंचा सत्कार सोहळा इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेतर्फे या सत्कार सोहळ्याचे आयोजन पुणे शहरात हॉटेल श्रेयस, डेक्कन जिमखाना येथे सोमवारी करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, समन्वयक किराश बेहरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास ‘ताम’चे अध्यक्ष अनिल झोडगे, सरचिटणीस संदीप ओंबासे, खजिनदार डॉ. प्रसाद कुलकर्णी, सीईओ गफार पठाण, तुषार आवटे, कमलेश मोतीवाला, भास्कर करकेरा, सुरेश चौधरी, शिवाजी चव्हाण, प्रमोद दौंडे, उषा शिर्के, पंडित शेळके, कांबळे, सचिन माळी, राहुल कोते, सुरेश आव्हाड, मनोज इंगळे, असिम सिंग सोधी, नारायण कराळे, तुषार सिनलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यांचीही उपस्थिती होती.
सत्कारमूर्ती खेळाडू (box) महाराष्ट्राचे १९ तायक्वांदो खेळाडू प्रथमच जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या सोहळ्यात राज जाधव, ध्रुव शेट्टी, साई जाधव, किरण कदम, निशिता पाडेकर, संस्कृती पाटील, स्वयम चव्हाण, अक्षरा शानबाग, श्रावणी तेली, रुद्र खंडारे, कियान देसाई, आर्यन सरकार, धनश्री पवार, सिद्धी बेंडाळे, स्वाहिली दळवी, स्वरुप रेडेकर, प्रिशा शेट्टी या खेळाडूंचा सत्कार इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
पहिले सर्व खेळाडूं , प्रशिक्षक, पालक, व पदाधिकारी यांचे अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा या वर्षी आपल्या अहमदनगर मधील दोन खेळाडू सिलेक्शन ट्रायल ला क्वालिफाय झाले होते व त्या दोघांनी ही कांस्यपदक पटकावले आहे. लवकरच येणार्या काळात आपल्या नगरचे ही खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करतील याचे मी सर्वांना आश्वासन देतो.
नारायण कराळे (Ns Nis cc Coach)
Leave a reply