दौंड प्रतिनिधी किरण थोरात दौंड : राहू दि :१३ ऑगस्ट रोजी राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राहु डुबेवाडी येथील सन्मान फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने १३ ऑगस्ट रोजी डुबेवाडी येथील विठ्ठल रुक्माई मंदिर,मालोबा मंदिर व डुबेवाडी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
यावेळी राजमाता अहिल्यादेवी यांच्या स्मृतीला अभिवादन करून झाडे लावा झाडे जगवा हा संकल्प रुजू केला. यावेळी मान सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्रीकृष्ण डुबे,डुबेवाडी गावचे सरपंच देविदास डुबे, अँड . संजय डुबे,मा ग्रामपंचायत सदस्य संपत डुबे,शिवाजी डुबे,भाऊसाहेब डुबे,मा.उपसरपंच रामचंद्र डुबे, राजेंद्र डुबे, दत्तात्रय डुबे, खरेदी विक्री सं -संचालक अश्रू डुबे, प्रा. योगेश वाघमोडे, पांडुरंग डुबे, संजय डुबे, मा. तंटामुक्ती अध्यक्ष आनंद डुबे, पोपट डुबे, सौरभ डुबे, तात्या डुबे, लहू डुबे व समस्त डुबेवाडी ग्रामस्थच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
राहू डुबेवाडी येथे राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण

0Share
Leave a reply