नांदेड प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : रितेश कल्याण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सलाठी येथील आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा संघटने चे पदाधिकारी यानी तहसील कार्यालय येथे अमरण उपोषण बसत असलायचे निवेदन आज दिले. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मौ. अंतरवाली ता.अंबड जि.जालना येथे जे शांततेच्या मार्गाने उपोषण चालु आहे.ते उपोषण हाणुन पाडण्यासाठी उपोषण समर्थक मराठा समाज बांधवावर पोलीसानी अमानुष पणे लाठीचार्च व गोळीबार करण्यात आला.
या घटनेत अनेकांना गंभीर दुःखापत झाली या घटनेच्या निषेधार्थ दि.४-९-२३ सोमवार रोजी नायगाव बाजारपेठ बंद ठेऊन शासना विरुद्ध निदर्शन करण्यात आले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सलाठी येथील आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीने आज दिनांक ०६/०९/२०२३ तारीखे पासून शांततेच्या मार्गाने उपोषण चालु आहे. सदर निवेदन माणिक पाटील चव्हाण, बंटी पा.शिंदे, शिवराज पा.चव्हाण, ओमकार पा.घाटोळ, अजिंक्य दिगंबरराव कल्याण, श्रीहरी पा.कदम सोमठानकर, बालाजी शिवाजी पा.कदम, देविदास दिगंबर पा.कदम, माधव पांडुरंग गाटे,प्रकाश धोंडीबा जीगळेकर, श्रीनिवास कदम, विकास कदम, संतोष कदम यानी तहसील कार्यालय येथे दिले आहे.
अंतरवाली पोलिसांच्या लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ नायगाव तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु

0Share
Leave a reply