दिशाशक्ती / रमेश खेमनर : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त गोटुंबे आखाडा येथील बजरंग प्रतिष्ठानतर्फे सांयकाळी गावातील भजनी मंडळातर्फे 5 ते 6 या वेळेत हरिपाठाचे व त्यानंतर 6 ते 8 या वेळेत विनोदाचार्य ह.भ.प.संजय महाराज म्हसे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन समाप्ती नंतर बजरंग प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कर्यक्रमाचे आयोजन बजरंग प्रतिष्ठान तर्फे व सकल हिंदू समाज तरुणांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गावातील भजनी मंडळ व गावातील सर्व नागरिकांचे मोठया प्रमाणात सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी गावतील सर्व महिला व पुरुष राम भक्तानी मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.
गोटुंबे आखाडा येथे बजरंग प्रतिष्ठाणतर्फ प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0Share
Leave a reply