विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : लोकसभा निवडणूक घोषीत झाल्यापासुन नगर जिल्हा राजकिय घडामोडीनी ढवळुण निघाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशे दोन्ही प्रमुख उमेदवारांची घोषणा झाली आहे. महायुती विरुध्द महाविकासआघाडी आशी सरळ लढत होनार हे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील प्रमुख ओबीसी नेत्यानी राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म, नाशिक येथे भेट घेतली. नुकतीच फेब्रुवारी महिन्यात नगर शहरामध्ये ओबीसी ,भटके विमुक्त महाएल्गार सभा पार पडली होती. या सभेने जिल्ह्यतील गर्द्दीचा विक्रम केला होता. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा ओबीसी बाहुल्य मतदारसंघ मानला जातो.
या मतदारसंघमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघमध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार यामध्ये ओबीसी समाज निर्णायक मानला जातो. माळी , धनगर , वंजारी या जातींचा प्रमुख प्रभाव आहे. नगर दक्षिण मतदारसंघ मध्ये ओबीसी ,भटकेविमुक्त समाजाची सांख्या आठ लाखाच्या आसपास आसलयाचे बोलले जाते. मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण मिळावे या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला मंत्री छगन भुजबळ यानी कडाडून विरोध केला होता. यातून छगन भुजबळ याना नगर दक्षिण मधिल ओबीसी समाजाचा मोठया प्रमानावर पाठिंबा मिळला होता.
भुजबळ यानी ओबीसी समाजासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे भुजबळ यांच्याविषयी ओबीसी समाजात सहानुभूतीची लाट आहे. नगर दक्षिणमधिल आगामी लोकसभा निवडणूकित ओबीसी समाजाची भूमिका काय असावी यासाठी नगर जिल्ह्यातील प्रमुख ओबीसी नेत्यानी भुजबळ यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. मंत्री भुजबळ जो आदेश देतिल त्या आदेशाला सर्वोच्च समजुन जिल्ह्यातील सर्व ओबीसी नेते आणि कार्यकर्ते काम करणार आशी महिती काही ओबीसी नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी समता परिषदेचे विभाग प्रमुख अंबादास गारुडकर, पारनेर पंचायत समितीचे मा.सभापती खंडूजी भुकन , पारनेर बाजार समिती संचालक किसन रासकर , भारतीय जनता मोर्चा ओबीसी उपाध्यक्ष सुधाकर आव्हाड , माजी प्रशासकिय अधिकारी दिलीप खेडकर, पाथर्डीचे नगरसेवक रमेश गोरे , श्रीगोंदा तालुक्यातील सरपंच विजय शेंडे, नाभिक समाजाचे ओबीसी नेते अनिल निकम ,नाथशेठ रासकर, प्रसाद खामकर ,ज्ञानेश्वर खराडे सर , दिपक खांदे, स्वप्नील झगडे, देविदास शिंदे, अरुण देडगे आदि उपस्थीत होते.
नगर दक्षिणेत भुजबळांचा आदेश सर्वोतोपरी, जिल्ह्यातील प्रमुख ओबीसी नेते भुजबळांच्या भेटीला.

0Share
Leave a reply