नाशिक प्रतिनिधी / छगन कोळेकर : हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक महाराष्ट्र राज्य आयोजित मातोश्रींची त्रिशताब्दी वर्ष साजरी करण्याची ध्येय समितीच्या वतीने घेऊन संपूर्ण वर्षभर 300 मातोश्रींच्या मूर्ती वाटप करण्याचे ध्येय समितीने घेतले आहे. येत्या एक सप्टेंबर रोजी त्रंबकेश्वर येथे मातोश्रींची पुण्यतिथी मागील वर्षीही साजरी केली आणि यावर्षी साजरी करण्याच्या नियोजनासाठी त्र्यंबक ला गेलो असता गोरठाण या गावातील तरुण मंडळी व ग्रामपंचायत आवरातील व्यक्तींनी मातोश्रींचा पुतळा मागणी केली होती. त्यानिमित्त आज ग्रामपंचायत ला जाऊन मातोश्रींचा पुतळा या ठिकाणी देण्यात आला या ठिकाणी गावातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य तसेच तरुण गावकरी मंडळी उपस्थित होती.
या ठिकाणी आदिवासी भागामध्ये मातोश्री ची जयंती पुण्यतिथी जोरदार साजरी होण्यासाठी ही मूर्ती देण्यात आली. आणि एक सप्टेंबर ची नियोजनासाठी नियोजन बैठक पार पडण्यात आली. या याप्रसंगी समितीचे श्री समाधान भाऊ बागल यांनी मातोश्रींच्या कार्यकर्तुत्वावर तसेच त्र्यंबक मधील कार्याबद्दल माहिती दिली आणि नियोजनाचे स्वरूप हे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये व दिंडी सोहळा निघणार आहे. कुशावर्त या ठिकाणी जाऊन मातोश्रींची आरती गोदा आरती तसेच महाभिषेक होणार आहे. या सोहळ्यासाठी होळकर घराण्याची वंशज, पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच पुरोहित महासंघ, साधुसंत, इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे. या ठिकाणी समिती सदस्य वैभव रोकडे,अण्णासाहेब सपनार, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य मंडळी तरुण गावकरी वर्ग उपस्थित होते.
Leave a reply