कर्जत प्रतिनिधी / भगवान पाटील : कर्जत तालुक्यातील वायसेवाडी येथील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्री.जय हनुमान ग्राम विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार श्री.बाबुराव बाबुराव दोलताडे यांचा पराभव झाला असून त्यांच्या विरोधात श्री.हनुमान ग्राम विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार श्री.मनेष पोपट हिरणवाळे हे विजयी झाले आह़े.
पराभव होऊनही सरपंच पदाचे उमेदवार श्री.बाबुराव बाबुराव दोलताडे व कुटुंबीयांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत आपुलकीने सर्व विजयी उमेदवारांना स्वताच्या निवासस्थानी बोलावून त्यांच्या विजयाबद्दल त्यांना फेटे बांधले सर्व परिवाराने सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार केला अणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दोलताडे यांचे कुटुंबीय सुशिक्षित कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबात क्लासवन अधिकारी पदावर कार्यरत असून व सुशिक्षित कुटुंब आह़े त्यांच्या या कृतीतून एक वेगळी चुणूक दिसून आली असून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आह़े.
वायसेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी श्री.हनुमान ग्राम विकास पॅनलचे मनेष पोपट हिरणवाळे विजयी

0Share
Leave a reply