राहता प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री,महसूल,पशुसंवर्धन व दुग्धविकास, महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील मित्र मंडळ नांदूर व ग्रामपंचायत नांदूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज १५जून २०२४ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबीरामध्ये रक्तदाते सरपंच विशाल गोरे,अर्जुन गोरे,उप सरपंच सुदर्शन पारखे,दिपक घोरपडे, ऍड.प्रमोद आवारे, प्रवीण गोरे ,सुनील आभाळे, तुषार दिवटे,अमर गोरे, प्रवीण बोधक,संदीप विघावे,ओमकार गोरे, किशोर सोडणार ,जावेद शेख,ग्रामस्थ या सर्वांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद दिला. रक्तदान केल्यानंतर तुमचे शरीर रक्ताची कमतरता भरुन काढण्याचे कार्य करते, यामुळे तुमचे आरोग्य सुधारू लागते.आजच्या रक्तदान शिबिराला डॉ. तनया कुलकर्णी व प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्वांचे मनापासून आभार.
राहता तालुक्यातील नांदूर येथे ना.राधाकृष्ण विखेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न..!

0Share
Leave a reply